Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

डॉक्टरांचा अंदाज ठरला जीवघेणा! पुण्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या तरुणाला दिलं पित्ताचं औषध, घरी गेल्यानंतर 15 मिनिटांतच…

डॉक्टरांचा अंदाज ठरला जीवघेणा! पुण्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या तरुणाला दिलं पित्ताचं औषध, घरी गेल्यानंतर 15 मिनिटांतच…

Sumit Gadre Case: पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या एका गंभीर चुकीमुळे 30 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला असतानाही डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष करत केवळ पित्ताचे (Acidity) औषध देऊन घरी पाठवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातून घरी पोहोचल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच या तरुणाचा मृत्यू झाला.

नेमका घटनाक्रम काय?

जुनी सांगवी परिसरातील ममतानगरमध्ये राहणारा सुमीत श्रीकांत गद्रे (सोनावणे) याला रविवारी पहाटे 3:40 च्या सुमारास छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. घाबरलेल्या नातेवाईकांनी विलंब न करता त्याला औंध जिल्हा रुग्णालयात नेले. ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी सुमीतची ‘ईसीजी’ (ECG) चाचणी केली आणि रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगत त्याला हृदयविकार नसल्याचे खात्रीने सांगितले. त्यानंतर त्याला पित्त आणि मळमळीची औषधे तसेच एक पेनकिलर इंजेक्शन देऊन घरी पाठवून दिले.

घरी पोहोचताच काळाचा घाला

रुग्णालयातून उपचार घेऊन सुमीत घरी पोहोचला, मात्र त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच तो अचानक जमिनीवर कोसळला. नातेवाईकांनी त्याला पुन्हा धावतपळत रुग्णालयात नेले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी अंती सुमीतला मृत घोषित केले. रुग्णालयात जर वेळीच योग्य निदान झाले असते किंवा त्याला ‘ससून’ सारख्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला असता, तर सुमीतचा जीव वाचला असता, असा संताप आरोग्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

या धक्कादायक प्रकारानंतर सुमीतच्या कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतला. संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर सांगवी पोलिसांनी मध्यस्थी केली आणि ससून रुग्णालयातील तज्ज्ञांच्या अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी सुमीतचे पार्थिव ताब्यात घेतले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!