Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Mayor : महापौरपदाची निवडणूक 9 फेब्रुवारीला होणार; उमेदवारी अर्ज 6 फेब्रुवारीला दाखल करता येणार

Pune Mayor : महापौरपदाची निवडणूक 9 फेब्रुवारीला होणार; उमेदवारी अर्ज 6 फेब्रुवारीला दाखल करता येणार

Pune Mayor: पुणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे. या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची एकहात्ती सत्ता आली आहे. त्यानंतर महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात महापौरपद महिला खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

आता महापौरपदाची निवड करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. विभागीय आयुक्त यांनी या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती केली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. महापौरपदाची निवडणूक होणार त्या दिवशी सभा सुरू झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत दिली जाते. त्यानंतर महापौरपदासाठी मतदान घेतले जाते.

आरक्षण सोडतीवरील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

पुणे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाले आहे. ही आरक्षण सोडत ही चक्रानुक्रमे होणे गरजेचे होते. पण ते झाले नाही. त्यामुळे ही आरक्षण सोडत रद्द करणारी याचिका उच्च न्यायालयात न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या शुक्रवारी (दि. ३०) सुनावणी होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!