Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Ganpati Visarjan : पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; ड्रोन, सीसीटीव्ही, मोबाइल व्हॅनद्वारे कडक नजर

Pune Ganpati Visarjan : पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; ड्रोन, सीसीटीव्ही, मोबाइल व्हॅनद्वारे कडक नजर

पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक (Pune Ganpati Visarjan) सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्ताची आखणी केली आहे. उद्या, 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता सुरू होणारी ही मिरवणूक 7 सप्टेंबर दुपारपर्यंत चालणार आहे. यासाठी सुमारे 8,000 पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. मोबाइल सर्व्हिलन्स व्हॅन, ड्रोन आणि 1,200 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संशयितांवर करडी नजर ठेवली जाणार आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीसाठी सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक आणि गुन्हे शाखेसह बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), शीघ्र कृती दल (QRT), केंद्र आणि राज्य राखीव पोलिस दल (SRPF) सतत गस्त घालणार आहे.

सोनसाखळी चोरी आणि मोबाइल चोरी रोखण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथके कार्यरत असतील. प्रमुख चौकांमध्ये पोलिस मदत केंद्र स्थापन केले जाणार असून, गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. संशयित व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी सर्व लॉजेस आणि हॉटेल्सची कसून तपासणी केली जात आहे. मिरवणुकीदरम्यान आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अॅम्ब्युलन्स आणि अग्निशमन दलाच्या गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर

मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांवर 1,200 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि अतिरिक्त कॅमेरे तैनात केले आहेत. याशिवाय, पाच मोबाइल सर्व्हिलन्स व्हॅन्स आणि ड्रोनद्वारे हवाई देखरेख केली जाणार आहे. ही व्हॅन्स शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयातील केंद्रीय नियंत्रण कक्षाशी जोडली जाणार असून, रिअल-टाइम मॉनिटरिंगद्वारे गुन्हेगारी रोखण्यावर भर दिला जाईल.

वाहतूक नियम आणि बंदी

पुणे पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन केले आहे. शहरातील 17 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील, तर 10 रस्त्यांवर वाहतूक वळवली जाईल. याशिवाय, दोन दिवस (6 आणि 7 सप्टेंबर) जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असेल. बंद रस्त्यांमध्ये खालील मार्गांचा समावेश आहे.

शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड, केळकर रोड, टिळक रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन कॉलेज (FC) रोड, भांडारकर रोड, पुणे-सातारा रोड, प्रभात रोड, सोलापूर रोड, बागडे रोड, गुरु नानक रोड, शास्त्री रोड

पर्यायी मार्ग कोणते

शिवाजी रोड: काकासाहेब गाडीतल चौक
लक्ष्मी रोड: संत कबीर चौक
सोलापूर रोड: सेव्हन लव्ह चौक
सातारा रोड: व्होलगा चौक
बाजीराव रोड: सावरकर पुतळा
शास्त्री रोड: सेनादत्त पोलिस चौकी
कर्वे रोड: नळ स्टॉप
FC रोड: गुडलक चौक

पार्किंग व्यवस्था

पार्किंगसाठी शहरात 18 ठिकाणी विशेष व्यवस्था केली आहे, ज्यात रमणबाग शाळा, गारवारे शाळा, अपटे शाळा, पेशवे पार्क, निलायम टॉकीज, अभासाहेब गारवारे कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, एसपी कॉलेज आणि भिडे पूल ते गाडीतल पूल यांचा समावेश आहे.

मानाच्या गणपतींचे नियोजन

  • कसबा गणपती: सकाळी 9:30 वाजता मांदाई येथील टिळक पुतळ्यापासून मिरवणूक सुरू होऊन दुपारी 2:45 पर्यंत टिळक चौकात पोहोचेल.
  • तांबडी जोगेश्वरी: बेलबाग चौकातून सकाळी 10:30 वाजता लक्ष्मी रोडमार्गे मिरवणूक.
  • गुरुजी तालीम: बेलबाग चौकात 10 मिनिटांचा गुलाल आणि 15 मिनिटांची आरती, त्यानंतर 11 वाजता लक्ष्मी रोडमार्गे मिरवणूक. तुळशीबाग आणि केसरीवाडा: दुपारी 12 वाजता बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडमार्गे मिरवणूक.
  • इतर मंडळे: दगडूशेठ हलवाई, महात्मा फुले मंडळ आणि अखिल मांदाई मंडळ दुपारनंतर मिरवणुकीत सामील होतील.
Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!