Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ram Navami: राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद

Ram Navami: राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद

Ram Navami: देशभरात उद्या 26 एप्रिल रोजी राम नवमी निमत्ताने वाहतूक पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होणार असून पुणे वाहतूक पोलिसांनी काही रस्ते बंद करण्यात येईल, अशी माहिती दिली. राम नवमी निमित्ताने उद्या शहरात विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून मिरवणूक तसेच विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यामुळे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्ग देत काही ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये, प्रामुख्याने पुण्यातील बाजीराव रोड आणि लष्कर परिसरातील रस्त बंद राहणार आहेत.

पुण्यातील बाजीराव रोड आणि लष्कर परिसरातील रस्ते बंद राहणार आहेत. दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होणार असून पुण्यातील काही रस्ते बंद राहणार आहेत.

बाजीराव रोड परिसर
पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मात्र, पर्यायी मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग : टिळक रोड–अलका टॉकीज चौक – खंडोजी बाबा चौक मार्गे वाहतूक वळविण्यात येईल.

लष्कर विभाग
वाय जंक्शन येथे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
एम.जी.रोडवरील वाहतूक 15 ऑगस्ट चौकातून उजवी/डावी वळविण्यात येईल.
महंमद रफी चौकानंतरची वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे वळविण्यात येईल.
कोहिनूर हॉटेल परिसरातून जाणारी वाहतूक भोपळे चौक व इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!