Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

थेऊर येथे जन्मदात्या आईने दोन महिन्यांच्या जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडून मारले; नंतर स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न

थेऊर येथे जन्मदात्या आईने दोन महिन्यांच्या जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडून मारले; नंतर स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न

थेऊर (पुणे): थेऊर येथील दत्तनगर-काकडे वस्ती परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या दोन लहान बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित महिलेने त्यानंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची माहिती घेत आहेत.

संबंधित महिला आपल्या माहेरी बाळंतपणासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे. तिने आपली दोन्हीही जुळी मुले पाण्याच्या टाकीत बुडवली व त्यानंतर स्वतःही त्या टाकीत उडी मारली.ही बाब घरातील मंडळींना समजल्यानंतर त्यांनी त्या महिलेसह दोन्ही बाळांना पाण्यातून बाहेर काढले. तोपर्यंत पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. सध्या पुढील कार्यवाही चालू असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दोन्ही बाळांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

दरम्यान जन्मदात्या आईने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले? आपल्या पोटच्या दोन बाळांना निर्घृणपणे का मारले? हे अद्यापपर्यंत समजले नाही. लवकरच याबाबत माहिती समोर येईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!