Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बेकायदा मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री करणार्‍या दोघांना अटक; इंजेक्शनच्या १९० बाटल्या जप्त

बेकायदा मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री करणार्‍या दोघांना अटक; इंजेक्शनच्या १९० बाटल्या जप्त

पुणे: नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री करणार्‍या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मेफेटरमाईन सल्फेट (टर्मीन) इंजेक्शनच्या १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या. योगेश सुरेश राउत (वय-२५ वर्षे रा.रा. घुलेवस्ती हाईटस, मोरेवस्ती मांजरी बु.हडपसर पुणे) आणि निसार चाँद शेख (वय-२३ वर्षे रा.१५ नं घाडगे गल्ली शेख चाळ हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील विविध परिसरात तरूण मुले ही अंमली पदार्थ घेवून नशापाणी करून गुन्हेगारीकडे वळत असल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी वेळोवेळी सक्त कारवाई करून समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ मार्च रोजी तपास पथक प्रभारी अधिकारी हसन मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक, सत्यवान गेंड पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार दिपक कांबळे, अभिजीत राऊत, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महावीर लोंढे, चंद्रकांत रेजिवाड हे पेट्रोलींग करीत असताना दोनजण मेफेटरमाईन सल्फेट (टर्मीन) इंजेक्शनची विक्री करत असल्याची गोपनीय बातमी मिळाली. या बातमीवरून पोलिसांनी छापा मारत योगेश राउत आणि निसार शेख यांना ताब्यात घेतले. या कारवाईत त्यांच्याकडून एकूण ६० मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शन आयपीच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. याबाबत त्यांच्याकडे अधिक विचारणा केली असता, सदरचे औषध हे नशा करण्यासाठी असून त्याची विक्री करत असल्याचे सांगितले.

आरोपी योगेश राउत आणि निसार चाँद शेख यांच्याकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना, सदरचे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसताना, सदर औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होवुन, औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होवु शकते, हे माहित असताना सुध्दा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्रीकरिता आपले कब्जात घेवुन मिळून आल्याने हडपसर पोलिसांकडून भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७५, २७८, १२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश सुरेश राउत व निसार चाँद शेख यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून त्यांच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या आणखी १३० बॉटल्स या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींकडून आज रोजी पर्यंत एकूण १९० मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. त्याची बाजार भावानुसार अंदाजे किंमत एक लाख इतकी आहे. गुन्ह्याचा अधिक तपास हसन मुलाणी, पोलीस उप निरीक्षक हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोनि. (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, निलेश किरवे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, अमोल दणके, कुंडलीक केसकर, अमित साखरे, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महाविर लोंढे, महेश चव्हाण, बापु लोणकर यांच्या पथकाने केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!