Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ब्लॅकमेल करून पैसे मागणारे दोन पोलीस निलंबित; येरवडा परिसरातील घटना

ब्लॅकमेल करून पैसे मागणारे दोन पोलीस निलंबित; येरवडा परिसरातील घटना

पुणे : मैत्रीणीसोबत बोलत थांबलेल्या तरुणाला ब्लॅकमेल करून, गुन्हा दाखल करण्याच्या धमकीने ५० हजार रुपये मागणाऱ्या येरवडा पोलिस ठाण्यातील दोघा पोलिसांना सोमवारी (दि. ५) निलंबित करण्यात आले. पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

दयानंद शिवाजी कदम आणि अश्विन ईश्वर देठे अशी दोघांची नावे आहेत. हा प्रकार उजेडात आल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेलली. या दोघा पोलिसांचे वर्तन अशोभनिय, बेशिस्त आणि बेजबाबदारपनाचे असून, त्यांच्या कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. याबाबतची चौकशी लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्याकडे देण्यात आली आहे.

पोलिस कर्मचारी कदम आणि देठे हे दोघे २४ एप्रिल रोजी येरवडा परिसरात गस्त घालत होते. कॉमर झोन परिसरात तरुण-तरुणी गाडीत बोलत थांबले होते. त्यावेळी दोघे पोलिस तेथे आले. त्यांनी तरुणाला तुम्ही गाडीत बसून अश्लील चाळे करत असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच, कारवाई टाळण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली. तरुणाने याबाबत थेट येरवडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

हा तरुण टिंगरेनगर येथे वास्तव्यास असून तो महाविद्यालयीन शिक्षण घेतो. तो वैद्यकीय उपचारासाठी कॉमर झोन परिसरातील येथील एका डॉक्टरकडे आला होता. काम झाल्यानंतर तो बाहेर पडला. तरुणाला त्याची मैत्रीण भेटली. त्यावेळी सायंकाळचे पाच वाजले होते. तरुण आणि त्याची मैत्रीण दोघे चारचाकी गाडीत बसून गप्पा मारत होते. त्यावेळी कदम आणि देठे यांनी त्यांना धमकावून पन्नास हजार रुपयांची मागणी केली. तरुणाच्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर कदम आणि देठे यांना निलंबित करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!