Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गुन्ह्यांची माहिती पुणे पोलिसांनी दडवली ? वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणबद्दल आणखी धक्कादायक माहिती आली समोर

गुन्ह्यांची माहिती पुणे पोलिसांनी दडवली ? वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणबद्दल आणखी धक्कादायक माहिती आली समोर

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या नीलेश चव्हाण याचा शस्त्र परवाना शहर पोलिसांनी आधी नाकारला होता; मात्र, त्याने गृहराज्य मंत्रालयातून त्यासाठी परवानगी मिळवली असल्याची धक्कादायक माहिती बुधवारी ( दि. ४) पुढे आली. या प्रक्रियेमध्ये स्थानिक पोलिसांनी चव्हाण याच्या गुन्हेगारी कृत्यांची माहिती दडवली असल्याचे आरोप केले जात आहेत. वैष्णवीचा पती शशांक, दीर सुशील आणि नणंद करिश्माचा मित्र नीलेश चव्हाण यांनी एकाच महिन्यात शस्त्रांचे परवाने मिळवले असल्याची माहिती यापूर्वीच तपासात निष्पन्न झाली आहे. त्याबाबत हगवणे यांचा नातलग असलेल्या जालिंदर सुपेकर या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शिफारस केली असल्याचेही आरोप केले जात आहेत. या प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचे लक्षात आल्यावर सुपेकर यांची कारागृह विभागातून राज्य राखीव दलात तडकाफडकी बदली करण्यात आली.

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर पसार झालेल्या नीलेश चव्हाण याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळच्या सीमावर्ती भागातून गेल्या आठवड्यात अटक केली. सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. चव्हाण याने पुणे शहर पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यासाठी त्याने दिलेले कारण योग्य वाटत नसल्याने पोलिसांनी सुरुवातीला त्याचा परवाना नाकारला. त्यानंतर, चव्हाण याने राजकीय ताकदीचा वापर करून थेट तत्कालीन गृहराज्यमंत्र्याच्या शिफारसीने पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मंजूर करून घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

चव्हाण याच्याविरुद्ध यापूर्वी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा व अन्य गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शहर पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर चव्हाण याने गृहराज्य मंत्रालयात अपील केले. शस्त्र परवाना मिळवण्याची प्रक्रिया सुरु असताना गृहराज्यमंत्र्यांच्या सुनावणी दरम्यान शहर पोलिसानी या गुन्ह्याची माहिती का दडवली ? की तसे माहिती असूनही त्याला परवांना मंजूर करण्यात आला ? हे नेमकेपणाने स्पष्ट झाले नसले, तरी मंत्र्यांच्या शिफारसीमुळेच पुणे पोलिसांनी त्याला परवाना मंजूर केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!