Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Cyclone Alert : मोंथा चक्रीवादळाचे संकट; महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, पुण्यासह ‘या’ २० जिल्ह्यांत धो धो कोसळणार

Cyclone Alert : मोंथा चक्रीवादळाचे संकट; महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, पुण्यासह ‘या’ २० जिल्ह्यांत धो धो कोसळणार

Montha cyclone Maharashtra IMD warning : महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरला असला तरी पावसाची दमदार हजेरी कायम आहे. दिवाळीतही मुसळधार पावसाने झोडपलेल्या राज्यावर आता ‘मोंथा’ चक्रीवादळाचे नवे संकट घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होत असून, थायलंडने सुचवलेले ‘मोंथा’ हे नाव त्याला देण्यात आले आहे. हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे वेगाने सरकत असले तरी महाराष्ट्रावर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

पुढील ४८ तासांत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस कोसळू शकतो. आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. किनारी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ‘मोंथा’च्या प्रभावामुळे पुढील ४८ तासांत राज्यभरात वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पूरपरिस्थितीतून सावरत असलेल्या महाराष्ट्रासाठी हे नवे आव्हान ठरणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!