इंदापूर : प्रतिनिधी
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, लाखेवाडी (ता.इंदापूर) यांसह संलग्न संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.5) डिसेंबर रोजी शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांसाठी ‘आठवडे बाजार’ भरविण्यात आला होता.
विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव, पैशाचे महत्त्व, व्यवहार कौशल्य आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी या बाजाराचे खास आयोजन करण्यात आले होते.त्यातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींचा अनुभव मिळाला.
खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर विद्यार्थ्यांनी विक्रेते बनून पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत होता. बाजारातील गजबज पाहून संस्थेच्या उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, विश्वस्त ऋषिकेश ढोले, पृथ्वीराज ढोले, तसेच प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


