Today बुधवार, 11th फेब्रुवारी 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nilesh Ghaywal : पुणे पोलीस निलेश घायवळला फरफटत भारतात आणणार? आयुक्तांनी उचललं मोठं पाऊल

Nilesh Ghaywal : पुणे पोलीस निलेश घायवळला फरफटत भारतात आणणार? आयुक्तांनी उचललं मोठं पाऊल

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्या परदेश फरार प्रकरणाने पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई झाल्यानंतर घायवळ ११ सप्टेंबरपासून परदेशात असल्याचे उघड झाले आहे.

आता पुणे पोलिसांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, आयुक्त अमितेशकुमार यांच्या नेतृत्वात तपास तीव्र केला आहे. बनावट कागदपत्रे आणि खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळविल्याचा तपास सुरू असून, लूक आऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले आहे. घायवळला भारतात परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत आयुक्त अमितेशकुमार यांची चर्चा झाली असून, ३ ऑक्टोबर रोजी (शुक्रवार) या प्रकरणी महत्त्वपूर्ण बैठक झाली. घायवळने ‘गायवळ’ असे बनावट नाव आणि अहिल्यानगरमधील खोटा पत्ता वापरून तत्काळ पासपोर्ट मिळवल्याचे तपासात समोर आले आहे.

त्याच्या प्रतिज्ञापत्रात राज्यात गुन्हे नसल्याची खोटी माहिती दिल्यामुळे कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलिसांना शंका आहे की घायवळ लंडन किंवा स्वित्झर्लंडमध्ये असू शकतो, जिथे त्याच्या मुलांचे शिक्षण सुरू आहे आणि तो गुन्हेगारी कारवाया चालवत असावा.

पासपोर्ट कसा मिळाला?

मिळालेल्या माहितीनुसार, घायवळने २०१९ मध्ये पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला होता. यावेळी त्याने ‘निलेश बन्सिलाल गायवळ’ असे नाव आणि अहिल्यानगरमधील गौरी घुमट, आनंदी बाजार, माळीवाडा रोड येथील पत्ता दिला. अहिल्यानगर पोलिसांनी (कोतवाली स्टेशन) पत्ता तपासला असता, तेथे तो आढळला नाही. त्यामुळे ‘नॉट अवेलेबल’ अशी नोंद करून १६ जानेवारी २०२० रोजी अहवाल पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवला गेला. तरीही, पासपोर्ट कसा मिळाला, याचा तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!