पुणे: राजगड तालुक्यातील राजगड किल्ल्यावर पर्यटक महिलेच्या डोक्यात दगड पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात महिला जखमी झाली. माकडांमुळे ही घटना घडल्याच सांगण्यात येत आहे. गडावरून खाली उतरताना ही घटना घली. दुखापत झालेली महिला 38 वर्षीय आहे. महिलेच्या डोक्यात दगड पडल्यामुळे महिला जखमी झाली. तिच्यावर प्राथमिक उपचार करुन तिला पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात पाठविण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, किल्ले राजगडवर मुंबई येथून 20 महिलांचा ग्रुप आला होता. किल्ल्यावर माकडे खेळत होती. महिला खाली उतरत असताना, माकडांमुळे एक दगड खाली महिलेच्या डोक्यात पडला. वर्षा हुंडारी (वय अंदाजे 38) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर किल्ल्यावरील पहारेकरी विशाल पिलावरे, बापू साबळे आणि दादू वेगरे यांनी प्रसंगावधान दाखवून मुलांच्या मदतीने महिलेला अवघ्या तीस मिनिटात किल्ल्याचा खाली आणले.
महिला खाली आल्यानंतर राजगड पोलिस स्टेशनचे हवालदार सोमेश राऊत यांनी 108 क्रमकांच्या रुग्ण वाहिकेशी संपर्क साधून गाडी बोलावून महिलेला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. एकूणच तेथे असलेले पर्यटक मदतीला धावून आले.


