Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Raj Thackeray Sabha: ‘तर खड्ड्यात उभा करून मारेन…’; नाशिकमध्ये केलेल्या कामांबाबत सांगताना राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा

Raj Thackeray Sabha: ‘तर खड्ड्यात उभा करून मारेन…’; नाशिकमध्ये केलेल्या कामांबाबत सांगताना राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा

Raj Thackeray-Uddhav Thackeray Sabha: नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आज मनसे आणि शिवेसेनेची प्रचारसभा पार पडली. आजच्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. आजच्या आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी मनसेची सत्ता असताना केलेल्या विकासकामांची माहिती दिली आहे. तसेच राज ठाकरेंनी एक जुना किस्सा सांगिलता आहे. यात त्यांनी धमकी दिली होती अशी माहितीही दिली आहे. राज ठाकरेंनी नेमकी कुणाला धमकी दिली होती ते जाणून घेऊयात.

नाशिकच्या पाण्याचा प्रश्न सोडवला

राज ठाकरे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, ‘आमची सत्ता असताना कुंभमेळा झाला. उत्तम पार पडला. एकही झाड कापलं नाही. पहिल्या पाच वर्षात आम्ही धरणातून पाईपलाईन आणली. नाशिकच्या पाण्याचा प्रश्न सोडवून टाकला. जीपीएस लावलेल्या घंटा गाड्या सुरू केल्या. घनकचरा प्रकल्प सुरू केला. वाहतूक बेटांचं सुशोभिकरण केलं. बोटॅनिकल गार्डन केलं. या गार्डनची गेल्या पाच वर्षात वाट लावली आहे.’

खड्ड्यात उभा करून मारेन

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, आम्ही आलो तेव्हा नाशिक पालिकेवर 700 कोटीचं कर्ज होतं. आम्ही महापालिका कर्जमुक्त केली. आम्ही पाच वर्षाच्या काळात विरोधी पक्षाकडून आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशी महापालिका होती. रस्ते उत्तम केले होते. दर पावसाळ्यात पत्रकारांना चॅनलचे लोकं विचारायची खड्डे पडतात. मी इथल्या कंत्राटदारांची बैठक बोलावली होती. हे बजेट. तुमच्याकडे पैसे मागितले तर मला सांगा. बजेटमध्ये उत्तम रस्ते केले नाही आणि खड्डा पडला तर त्यात उभा करून मारेन. उत्तम रस्ते झाले. हे होऊ शकतं.

चांगलं नाशिक घडवणार

सभोवतालचं वातावरण बकाल आहे. त्यामुळे पोरं दुसरीकडे शिकायला जात आहे. कशाचा काही अटोक्यात नाही. अशा लोकांच्या हाती शहरं देणार आहात का. आनंद महिंद्रा, अंबानी टाटापासून सर्व आणली. ही माणसं कधी कुठल्या शहरात गेली नाही. प्रकल्प उभे केले. पाहायला काय मिळालं पराभव. ज्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या भूलथापांना बळी पडला. तुमच्या चिल्ल्यापिल्यांच भविष्य चांगलं करायचं असेल तर तुम्ही शिवसेना आणि मनसेच्या हाती सत्ता द्या. पुन्हा चांगलं नाशिक घडवल्या शिवाय राहणार नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!