Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rajya Sabha Election: शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या रिंगणात; संजय राऊतांचा मोठा खुलासा, महाविकास आघाडीत खलबतं सुरू

Rajya Sabha Election: शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या रिंगणात; संजय राऊतांचा मोठा खुलासा, महाविकास आघाडीत खलबतं सुरू

Rajya Sabha Election : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शरद पवार आगामी राज्यसभा निवडणूक पुन्हा लढवणार असल्याचे संकेत शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या सात जागांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये (MVA) हालचालींना प्रचंड वेग आला असून, पवारांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

मविआचा ‘संयुक्त’ उमेदवार आणि रणनीती
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष (ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गट) मिळून एकत्रित निर्णय घेतील. सध्याच्या संख्याबळानुसार, मविआचा एकच संयुक्त उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. राऊत म्हणाले की, माझी शरद पवारांशी चर्चा झाली असून त्यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आपली ही भूमिका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही कळवली आहे. पवारांचा ६० वर्षांहून अधिक काळ असलेला प्रदीर्घ संसदीय अनुभव पाहता, त्यांच्या नावावर मविआमध्ये लवकरच शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी; राऊत आक्रमक
एकिकडे राज्यसभेच्या चर्चा सुरू असतानाच, संजय राऊत यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सडकून टीका केली आहे. झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईनंतर राजकीय वातावरण तापले आहे. राऊत यांनी या प्रकरणावर बोलताना झिरवाळांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्रालयातील कार्यालय सील होणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून, नैतिकतेच्या आधारावर झिरवाळांनी पदावरून पायउतार व्हावे, असे राऊत यावेळी म्हणाले.

लाचखोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर प्रहार
नरहरी झिरवाळ यांच्यावरील कारवाईचा धागा पकडत संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. लाचखोरी मर्यादेबाहेर गेल्यामुळेच ही कारवाई झाली आहे आणि गृहमंत्री फडणवीस यांच्या संमतीशिवाय इतकी मोठी कारवाई होणे शक्य नाही, असा दावा राऊत यांनी केला. झिरवाळ यांच्या कार्यपद्धतीवर आणि चारित्र्यावर ताशेरे ओढताना, त्यांचे कार्य त्यांच्या तालुक्यातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. आगामी काळात शरद पवारांची उमेदवारी आणि झिरवाळांवरील आरोप या दोन मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!