Today शुक्रवार, 18th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Abroad Jobs: परदेशात नोकरी हवीय? महाराष्ट्र सरकारची ‘ही’ नवीन संस्था करणार स्वप्न पूर्ण..जाणून घ्या

Abroad Jobs: परदेशात नोकरी हवीय? महाराष्ट्र सरकारची ‘ही’ नवीन संस्था करणार स्वप्न पूर्ण..जाणून घ्या

Abroad Jobs: परदेशातील रोजगारासंबंधी प्रभावी व सर्वसमावेशक परिसंस्थेचा विकास करुन त्याद्वारे जगभरातील विविध देश, राज्यांतील रोजगारासंबंधी प्रभावी समन्वय व अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतीशिलता आणि क्षमता संस्था ही राज्यस्तरीय एकछत्री संस्था स्थापन व कार्यान्वित करण्यात आली असून संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबइ येथे आणि पाच विभागीय कार्यालये असणार आहेत.

याद्वारे परदेशात रोजगार मिळविणे सोपे होणार आहे.सद्यस्थितीत देशांतर्गत रोजगार निर्मितीचे आव्हान, विकसित देशांतील रोजगाराच्या उपलब्ध संधी, देशात मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत मिळणारे जादा वेतन या कारणांमुळे मागील काही वर्षापासून भारतीय युवा वर्गाचा कल आंतरराष्ट्रीय रोजगाराकडे वाढत आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील कामगार आणि विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. केरळ, तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांनी परदेशातील रोजगारासंबंधी एकछत्री शिखर संस्था स्थापन केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातही अशी संस्था स्थापन करण्यात आली आहे. त्याद्वारे परदेशांतील रोजगाराच्या संधी कुशल मनुष्यबळास उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

प्रशिक्षण संस्थांचे विस्तृत जाळे…
महाराष्ट्रात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रामध्ये मिळून एक हजार पेक्षा अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ३५० पॉलिटेक्निक आणि ८०० अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय व फार्मसी महाविद्यालये तसेच इतर सेवा क्षेत्रांशी संबंधित शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे विस्तृत जाळे असून त्याद्वारे कृषी व संलग्न क्षेत्रे, उद्योग, बांधकाम, आरोग्य, आतिथ्य, लॉजिस्टिक्स, बैंकिंग, उत्पादन, आयटी तसेच सेवा या क्षेत्रांत लक्षावधी कुशल कामगार तयार होत आहेत.

संस्थेच्या कार्यकक्षा….
आंतरराष्ट्रीय सहकार्य व करार, योग्य उमेदवारांचा डेटा बेस, मार्गदर्शन आणि समुपदेशन, कौशल्य , भाषा प्रशिक्षण, संस्कृती व शिष्टाचार बद्दल सहाय्य, कागदपत्रांबाबतच्या सुविधा, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा कार्यालये व मनुष्यबळ देणे, परदेशात जाणाऱ्या कुशल मनुष्यबळास कर्ज उपलब्ध करुन देणान्या वित्तीय संस्थांना हमी पुरवठा करणे, अपुरा आर्थिक स्रोत असलेल्या कुशल मनुष्यबळास परदेशातील रोजगारासाठी निधी उपलब्धता आदी कार्य संस्थेमार्फत केली जाणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!