Today रविवार, 9th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune RTO: दोन अक्षरांची मर्यादा संपली! पुणे आरटीओकडून ‘AAA’ सिरीजची घोषणा; वाहन नोंदणी होणार अधिक सुलभ

Pune RTO: दोन अक्षरांची मर्यादा संपली! पुणे आरटीओकडून ‘AAA’ सिरीजची घोषणा; वाहन नोंदणी होणार अधिक सुलभ

Vehicle Registration: ऑटोमोबाईल आणि आयटी हब म्हणून जगभरात नावाजलेले पुणे शहर आता वाहन नोंदणीच्या बाबतीत एक नवा मैलाचा दगड गाठत आहे. शहरातील वाहनांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने, आरटीओने आतापर्यंतची जुनी पद्धत मोडीत काढून तीन इंग्रजी अक्षरांची नवीन मालिका (Series) सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. देशाची राजधानी दिल्लीनंतर अशी प्रणाली राबवणारे पुणे हे देशातील दुसरेच शहर ठरणार आहे.

दोन अक्षरांची मर्यादा संपली!
पुणे आरटीओची सध्याची ‘दोन अक्षरी’ मालिका आता तिच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच ‘ZZ’ पर्यंत पोहोचली आहे. वाहनांच्या वाढत्या लोंढ्यामुळे ही मर्यादा लवकरच संपणार असल्याने प्रशासनाने भविष्यातील ३० ते ४० वर्षांचे नियोजन आत्ताच केले आहे. आता रस्त्यांवर ‘MH 12 AAA 0001’ अशा स्वरूपाचे आकर्षक क्रमांक पाहायला मिळतील. पुण्यात सध्या ४३ लाखांहून अधिक नोंदणीकृत वाहने असून, त्यापैकी ३० लाखांहून अधिक केवळ दुचाकी आहेत. सार्वजनिक वाहतुकीपेक्षा पुणेकरांचा ओढा खासगी वाहनांकडे असल्याने हा बदल अनिवार्य झाला आहे.

महसूल वाढीचे गणित
या नवीन बदलामुळे केवळ प्रशासकीय सोयच होणार नाही, तर आरटीओच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडणार आहे. तीन अक्षरी मालिकेमुळे नंबर प्लेटवर अर्थपूर्ण शब्द तयार करण्याची संधी वाहनधारकांना मिळणार आहे. पुण्यात ‘व्हीआयपी’ किंवा ‘फॅन्सी’ नंबरसाठी लाखो रुपये मोजण्याची क्रेझ मोठी आहे. नव्या सिरीजमुळे निवडीसाठी हजारो नवीन पर्याय उपलब्ध होतील, ज्यामुळे सरकारला मोठा महसूल मिळेल. ही संपूर्ण प्रक्रिया अधिक डिजिटल आणि पारदर्शक करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

पुणेकर सण-उत्सवाच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत. दसरा, दिवाळी आणि गुढीपाडव्यासारख्या दिवशी वाहनांच्या विक्रमी नोंदी होतात. अशा वेळी जुन्या मालिका अवघ्या काही दिवसांत संपुष्टात येतात. आयटी क्षेत्रातील विस्तार आणि वाढते शहरीकरण यामुळे पुण्याच्या ताफ्यात दरमहा हजारो वाहने सामील होत आहेत. या वाढत्या वेगाला सामावून घेण्यासाठी ‘तीन अक्षरी’ मालिका हे एक दूरदृष्टीचे पाऊल ठरणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!