Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एकनाथ खडसे यांच्या बंगल्यातील चोरीचा उलगडा! दागिन्यांसह रोकडही जप्त

एकनाथ खडसे यांच्या बंगल्यातील चोरीचा उलगडा! दागिन्यांसह रोकडही जप्त

Eknath Khadse House Robbery: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगला येथे झालेल्या चोरीप्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांनी उल्हासनगरमधून तीन संशयितांना अटक केली असून, आणखी तीन आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्यांपैकी एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध राज्यांमध्ये तब्बल २७ गुन्हे नोंदवलेले आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांना चोरीस गेलेले सोने, चांदीचे दागिने आणि रोकड रक्कम जप्त करण्यात यश आले आहे.

खडसे बंगल्याची रेकी करून चोरी

पोलिस तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी चोरीपूर्वी खडसे यांच्या निवासस्थानाची रेकी केली होती. या घटनेनंतर खडसे यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि सीडी चोरीला गेल्याचा आरोप केला होता. मात्र अधिकृत फिर्याद केवळ दागिन्यांच्या चोरीपुरती दिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, दागिन्यांचा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे. मात्र सीडी आणि कागदपत्रांबाबतचा तपास अद्याप सुरू आहे.

रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरही दरोडा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली होती. केवळ काही दिवसांच्या अंतराने माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बंगल्यातील चोरीमुळे या भागात मोठी खळबळ उडाली आहे. ९ ऑक्टोबरच्या रात्री मुक्ताईनगर व वरणगाव परिसरातील तीन पेट्रोल पंपांवर बंदुकीच्या धाकावर दरोडे टाकण्यात आले होते. त्यात रक्षा फ्युएल, मनुभाई आशीर्वाद (कर्की फाटा) आणि सय्यद पेट्रोल पंप (तळवेल फाटा) या ठिकाणांचा समावेश होता. आरोपींनी सुमारे १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केला होता.

विशेष तपास पथकाची कारवाई

या घटनांनंतर जळगाव पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे नाशिक आणि अकोला जिल्ह्यात छापेमारी करण्यात आली. त्यातून सचिन भालेराव, पंकज गायकवाड, हर्षल बावस्कर, देवेंद्र बावस्कर, प्रदुम्न विरघट आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी तपासामुळे दोन मोठ्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!