Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

Asha Bhosle : भारतीय संगीतसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आशा भोसले यांच्यावर इमर्जन्सी मेडिकल सर्विस युनिटमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी एबीपी माझाला दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आशा भोसले यांना शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आशा भोसले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. आशा भोसले या 92 वर्षांच्या असून आजही त्या संगीत क्षेत्रात सक्रिय आहेत.

त्यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच जगभरातील चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली आहे. आशा भोसले यांनी आपल्या जादुई आवाजानं रसिकांवर मोहिनी घातली आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. रुग्णालय व्यवस्थापनाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आशा भोसले या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि बहुमुखी गायिकांपैकी एक आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!