Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Accident News : लग्नाहून परतताना दुर्दैवी अंत; दुचाकी-रिक्षा धडकेत दोघांचा मृत्यू

Accident News : लग्नाहून परतताना दुर्दैवी अंत; दुचाकी-रिक्षा धडकेत दोघांचा मृत्यू

Accident News : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात मांडवा फाट्यावरील टी-पॉइंट वळणावर गुरुवारी (३० एप्रिल) सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकीने लोडिंग रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशन नांदुरकर (वय २९) आणि शुभम पांडुरंग वंजाळे (वय २८, रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) हे पुण्याहून बुलढाण्यातील बिबी येथे लग्नासाठी आले होते. लग्न आटोपून ते दुचाकीने आपल्या गावी परतत असताना मलकापूर पांग्राकडून येणाऱ्या लोडिंग रिक्षाला त्यांच्या दुचाकीने (MH 27 BH 6276) जोरदार धडक दिली.

या अपघातात रोशन नांदुरकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या शुभम वंजाळे यांना तातडीने मलकापूर पांग्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बिबी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्य केले.

दरम्यान, मलकापूर पांग्रा, बिबी आणि दुसरबीड टी-पॉइंट परिसरात दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. या ठिकाणी तातडीने गतिरोधक व दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!