Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Politics : कुणीही असू द्या, ओढून मारू; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून ठाकरेंच्या आमदाराला थेट धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics : कुणीही असू द्या, ओढून मारू; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून ठाकरेंच्या आमदाराला थेट धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेनेच्या दोन गटांमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने ठाकरेंच्या गटातील आमदाराला थेट धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने सिद्धार्थ खरात यांना उद्देशून “कोणीही असू द्या, आमदारालाही ओढून मारू,” असे वादग्रस्त विधान केले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या पत्रकार परिषदेत संदीप तठ्ठे यांनी माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या कामाचे श्रेय इतरांनी घेऊ नये, असा इशाराही दिला. “आमच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

या भडक आणि आक्रमक वक्तव्यामुळे मेहकरसह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विविध पक्षांकडून या विधानाचा निषेध होण्याची शक्यता असून प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या घटनेचे पडसाद पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून बुलडाण्यातील राजकारणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!