Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

चंद्रपूरमध्ये गौतमी पाटील उतरली प्रचारात! नाकात नथणी अन् गळ्यात काँग्रेसचा गमछा; सुधीर मुनगंटीवारांचं टेन्शन वाढलं

चंद्रपूरमध्ये गौतमी पाटील उतरली प्रचारात! नाकात नथणी अन् गळ्यात काँग्रेसचा गमछा; सुधीर मुनगंटीवारांचं टेन्शन वाढलं

चंद्रपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काही राजकीय नेते सिनेकलाकारांच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ आणि काँग्रेस उमेदवारांचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या प्रचारासाठी डान्सर आणि अभिनेत्री गौतमी पाटीलने मूल शहरात मोठा रोड शो केला.या रोड शोमध्ये अनेक राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात हा रोड शो पार पडला.

गौतमी पाटील माध्यमांशी बोलताना काय म्हणाली?
यावेळी गौतमी पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाली, “मला इथं येऊन खूप छान वाटतंय. मी अनेक ठिकाणी जाते.सर्व ठिकाणी मला भरभरून प्रेम मिळतंय. मूल शहराच्या विकासासाठी काँग्रेस पक्षातील उमेदवारांना आणि नगराध्य पदाकरिता उभ्या असलेल्या एकता समर्थ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा”, असं आवाहनही गौतमीनं यावेळी केलं आहे.

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटीलने मूल येथे काँग्रेससाठी प्रचार केला. या ‘रोड शो’च्या माध्यमातून काँग्रेसला विजयी करण्याचं आवाहन गौतमी पाटीलने केलं. एकता समर्थ मूल शहरासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. हे क्षेत्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात येत असल्याने इथे शेवटच्या क्षणी काँग्रेसने आपली ताकद पणाला लावली आहे.

गौतमी पाटीलची लोकप्रियता पाहता उमेदवारांनी तिचा रोड शो केल्याचं सांगितलं जात आहे. या रोड शोला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला.दरम्यान, राज्यातल्या नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. विविध पक्षांचे नेते मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.आज रात्री 10 वाजता हा प्रचार संपणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!