Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यात मोठी घडामोड! भाजपच्या १०२ नगरसेवकांचे राजीनामे; नेमकं काय घडलं?

राज्यात मोठी घडामोड! भाजपच्या १०२ नगरसेवकांचे राजीनामे; नेमकं काय घडलं?

Maharashtra politics : नागपूर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक ६ फेब्रुवारीला होणार असून, त्याआधीच भाजपमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका निता ठाकरे यांच्या नावावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मात्र, निवडणुकीपूर्वीच भाजपच्या निवडून आलेल्या सर्व १०२ नगरसेवकांनी एकत्रितपणे राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे सर्व राजीनामे नव्याने नियुक्त करण्यात आलेले सत्तापक्ष नेते बाल्या उर्फ नरेंद्र बोरकर यांच्या सूचनेनुसार घेण्यात आले आहेत. शनिवारी महाल येथील रजवाडा पॅलेसमध्ये पार पडलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत शहर भाजपाध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी बाल्या बोरकर यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असलेल्या बोरकर यांच्याकडे महापालिकेतील कामकाजाचा मोठा अनुभव असून, पक्षशिस्त राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बाल्या बोरकर यांनी स्पष्ट केले की, नगरसेवकांचे राजीनामे घेणे हा पक्षांतर्गत आचारसंहितेचा भाग आहे. भविष्यात पक्षविरोधी कारवाया किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई करता यावी, यासाठी ही पद्धत अवलंबण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा देण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, निता ठाकरे नागपूरच्या आठव्या महिला महापौर ठरण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत दक्षिण नागपूरला महापौरपद मिळावे, यावर चर्चा झाली होती. बैठकीनंतर महापौरपदाचे नाव ‘गुलदस्त्यात’ ठेवण्यात आले होते. मात्र, शनिवारी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत निता ठाकरे यांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपमहापौरपदी अॅड. संजय बालपांडे तर स्थायी समिती अध्यक्षपदी शिवानी दाणी यांची नियुक्ती होण्याचीही शक्यता आहे. याबाबत आज, रविवारी सायंकाळी शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा करू शकतात.

विशेष म्हणजे, नागपूरचे पहिले महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच शहराच्या ५५ व्या महापौरांचे नाव निश्चित झाल्याने या निर्णयाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आतापर्यंत नागपूर शहराला सात महिला महापौर लाभल्या असून, आता निता ठाकरे आठव्या महिला महापौर म्हणून इतिहासात नोंद होण्याची दाट शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!