Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

स्वप्नांचा चुराडा..! हळदी-कुंकवाला जाताना भीषण अपघात; दोन बहिणींचा मृत्यू, पुढच्या महिन्यातच होतं लग्न

स्वप्नांचा चुराडा..! हळदी-कुंकवाला जाताना भीषण अपघात; दोन बहिणींचा मृत्यू, पुढच्या महिन्यातच होतं लग्न

Nagpur Bhandara highway accident : नागपूर-भंडारा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला निघालेल्या दोन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. महालगावजवळ नाग नदीच्या पुलावर भरधाव वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे या दोघींचा मृत्यू झाला असून, घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

अलिशा आणि मोनाली या मामे-आते बहिणी असून त्या भुगाव येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात होत्या. नाग नदीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दोघीही गंभीर जखमी झाल्या. अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोनाली घाटोळे यांना उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेतच प्राण गमवावे लागले.

अपघातानंतर नागपूर-भंडारा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवले असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

अलिशा मेहर या पिपळा डाक बंगला परिसरातील रहिवासी होत्या. त्यांचा अवघ्या सात महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तर मोनाली घाटोळे यांचा विवाह येत्या २६ फेब्रुवारी रोजी ठरलेला होता. लग्नाची तयारी, खरेदी सुरू असतानाच हा काळाने घाव घातला. दोन तरुण आयुष्यांच्या अकाली अंतामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नागपूर शहरावर शोककळा पसरली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!