Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठ्या नेत्यांची गुपितं दडपण्यासाठी Ashok Kharat चा एन्काऊंटर? भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा; तारीख ही सांगितली

मोठ्या नेत्यांची गुपितं दडपण्यासाठी Ashok Kharat चा एन्काऊंटर? भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा; तारीख ही सांगितली

Ashok Kharat Case: नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणात अडकलेल्या अनेक बड्या नेत्यांचे धाबे दणाणले असून, अशोक खरातचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो, असा खळबळजनक दावा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. या दाव्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून खरातला संपवण्याचा कट रचला जात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कधी होणार एन्काऊंटर?
अशोक खरात याच्याकडे अनेक मंत्री आणि बड्या राजकारण्यांची महत्त्वाची माहिती असू शकते. हे सर्व संबंध उघड होऊ नयेत, यासाठी खरातला कायमचं संपवण्याचा डाव आखला जात असल्याची शंका काही पीडितांनी व्यक्त केली आहे. तृप्ती देसाई यांच्या दाव्यानुसार, 24 मार्च रोजी खरातचा एन्काऊंटर केला जाण्याची दाट शक्यता आहे. या कटामागे मोठे हात असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने यात लक्ष घालून हा डाव उधळून लावावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रुपाली चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी होणार?
दुसरीकडे, या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला असला, तरी आता त्यांच्यावर आणखी कठोर कारवाईची मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या चाकणकर यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे केवळ राजीनामा पुरेसा नसून, सुनेत्रा पवार त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षातच पडले दोन गट
मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून तात्काळ हटवावे, यासाठी पक्षातूनच मोठा दबाव येत आहे. मात्र, पक्षात या विषयावरून मतभेद असल्याचेही समोर आले आहे. पक्षातील एक ज्येष्ठ नेता चाकणकर यांच्यावर कोणतीही टोकाची कारवाई होऊ नये, यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. मात्र, सुनेत्रा पवार पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी त्यांची उचलबांगडी करण्याच्या विचारात असल्याचे समजते.

नक्की वाचा – Rupali Chakankar: एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असतील तर तो गुन्हा आहे का? पुराव्यासह सगळी उत्तर देणार, रुपाली चाकणकर स्पष्टच बोलल्या

अशोक खरात आणि नेत्यांचे लागेबांधे
अशोक खरात याचे अनेक बड्या नेत्यांशी असलेले फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण गंभीर बनले आहे. रुपाली चाकणकर यांनी खरात यांचे पाद्यपूजन केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणातील मूळ सूत्रधार कोण आहेत आणि खरातच्या अटकेनंतर कोणाचे चेहरे समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपीचा जीव धोक्यात असल्याचे समोर आल्याने आता पोलिसांच्या भूमिकेकडेही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!