Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धक्कादायक! माढ्यात वडीलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडत 14 वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या

धक्कादायक! माढ्यात वडीलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडत 14 वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या

माढा : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आढेगावमध्ये आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाने आपल्या वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीधर गणेश नष्टे असे आत्महत्या केलेल्या 14 वर्षीय मुलाचे नाव आहे. आज (दि. २७) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील गणेश नष्टे हे सिमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. बंदुकीचे लायसन्स हे जम्मू काश्मीरचे आहे. वडिलांची घरातील बंदुक घेत खुर्चीवर बसून डोक्यात गोळी झाडून श्रीधरने आत्महत्या केली आहे. टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, खेळता खेळता ही दुर्घटना घडली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

श्रीधर हा इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जिजामाता प्रशालेमध्ये आठवीत शिक्षण घेत होता. तो आजारी असल्याने घरीच होता. त्याला दवाखान्यात नेऊन तपासणी करून आणले होते. डॉक्टरांनी श्रीधरला विश्रांतीचा सल्ला दिला होता. सोमवारी त्याने अज्ञात कारणाने दुपारी घरात वरच्या मजल्यावर जाऊन रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज एकून घरातील आई, आजोबा धावत आले असता, तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. श्रीधर याचे वडील राजस्थानमध्ये सीमा सशस्त्र दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. सध्या तो आई, लहान भाऊ, आजी, आजोबा यांच्यासमवेत राहत होता. सदर घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे या करीत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!