Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sangli News : भाजपने उमेदवारी नाकारल्याच्या चर्चा; माजी नगरसेविकेने लिहलं रक्ताने पत्र

Sangli News : भाजपने उमेदवारी नाकारल्याच्या चर्चा; माजी नगरसेविकेने लिहलं रक्ताने पत्र

Sangli Mahangarpalika Election 2026 : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीच्या (१५ जानेवारी) पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा असंतोष निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक १९ मधून भाजपची उमेदवारी डावलली जाण्याच्या चर्चेनंतर माजी नगरसेविका तथा दोन वेळा सभापती राहिलेल्या उषा अशोक पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे न्याय मागण्याचा इशारा दिला आहे.

उषा पवार यांनी माध्यमांना सांगितले की, “प्रभागात मी सर्व्हेत आघाडीवर होते, जनतेत माझा मोठा स्वीकार आहे. तरीही उमेदवारीचा विचार झाला नाही. पक्षातील अन्याय दूर व्हावा यासाठी लाडक्या बहिणीच्या न्यायासाठी मी रक्ताने पत्र देणार आहे. पक्ष वरिष्ठ नक्कीच विचार करतील आणि मला न्याय मिळेल असा विश्वास आहे.” प्रभाग १९ मध्ये त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, महिला सक्षमीकरण अशा अनेक विकासकामे केली आहेत.

दरम्यान, सांगली महापालिकेत भाजप-शिंदे सेना युतीची जागावाटप चर्चा फिस्कटल्याचे चित्र आहे. काल रात्री झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने शिंदे सेनेचे इच्छुक उमेदवार स्वतंत्र अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. मिरजमधील मोहन वनखंडे यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध झाल्याने वाद निर्माण झाला. त्यामुळे महायुतीतून शिंदे सेना बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपमध्येही उमेदवारीवरून अंतर्गत संघर्ष सुरू आहे. प्रभाग १४ (गावभाग) आणि १२ (वखारभाग) मध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांचा आग्रह आहे. तर प्रभाग ९ आणि १० मध्ये आमदार सुधीर गाडगीळ व जयश्री पाटील समर्थकांमध्ये रस्सीखेच आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने अनेक प्रभागांत वाद आहे.

भाजपचे पदाधिकारी शिष्टमंडळ रात्री मुंबईला रवाना झाले असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन उमेदवार यादी अंतिम करणार आहे. सांगलीत भाजपची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे सांगली महापालिका निवडणुकीत महायुतीची एकजूट आणि भाजपची अंतर्गत स्थिती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!