करमाळा: जेऊर (ता. करमाळा) येथील पोस्ट ऑफिसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. आगीने मोठ्या प्रमाणात रौद्ररूप धारण केले. ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
घटनास्थळी करमाळा नगरपालिकेची अग्निशमन गाडी दाखल झाली असून त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. आगीचे कारण मात्र अद्यापर्यंत समजू शकलेले नाही. आज (दि. १०) महावीर जयंती असल्याने कार्यलायाला सुट्टी होती. त्यामुळे कार्यलायामध्ये कर्मचारी उपस्थित नसल्याने कोणतीही जीवित हानी झाल्याची शक्यता नाही. कार्यालयाच्या छतावरुन धुराचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर आग लागल्याचे लक्षात आले.
View this post on Instagram


