Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kolhapur Liquor Seized : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘दारूचा नजराणा’; कोल्हापुरात सव्वा कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त

Kolhapur Liquor Seized : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘दारूचा नजराणा’; कोल्हापुरात सव्वा कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त

Kolhapur Liquor Seized : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्रीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा येथे गोवा बनावटीचे विदेशी मद्य बेकायदेशीररीत्या वाहतूक करणारा ट्रक पकडून सुमारे एक कोटी ३० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजापूर-मलकापूर मार्गावर अणुस्कुरा फाटा परिसरात पहाटे साडेपाचच्या सुमारास संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या सहा चाकी ट्रकची (एमएच-२०-ईजी-१३१०) तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमधील कंटेनरमध्ये गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये १८० मिली क्षमतेच्या १,६०० बॉक्समधील ७६,८०० सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्याची किंमत एक कोटी १५ लाख २० हजार रुपये आहे. यासह ट्रक आणि मोबाईल असा १५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी रामजीवन विरधाराम बिश्नोई (वय २६, रा. बाडमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथक क्रमांक-१ ने ही कारवाई केली असून, पुढील तपास दुय्यम निरीक्षक अजय वाघमारे करत आहेत.

दरम्यान, पन्हाळा तालुक्यातील मरळी येथेही बेकायदेशीर विदेशी मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई करण्यात आली. टेंपोमधून अवैध मद्य वाहतूक करताना विशाल मदन कणसे (वय ३३, रा. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत एक लाख ९१ हजार ३२५ रुपयांची विदेशी दारू आणि टेंपो असा एकूण तीन लाख ६६ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यात धडक मोहिम सुरू आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!