Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, भाजपमध्ये करणार प्रवेश

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, भाजपमध्ये करणार प्रवेश

Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते समरजीत घाटगे यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

समरजीत घाटगे आज मुंबईत रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मध्ये प्रवेश केला होता. मात्र अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये ‘घरवापसी’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

समरजीत घाटगे यांनी कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. भाजपमध्ये जाण्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “माझा भाजपप्रवेश काही दिवसांपासून प्रलंबित होता.

कार्यकर्त्यांचा कल भाजपकडे असल्याने आणि पक्ष नेतृत्वाशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला.” तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आदर व्यक्त करत “त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळणार याचा आनंद आहे,” असेही त्यांनी म्हटले. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!