Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sangli news : नर्सरीला भीषण आग; नवरा बचावला, पत्नीचा संशयास्पद मृत्यू; सांगलीत खळबळ

Sangli news : नर्सरीला भीषण आग; नवरा बचावला, पत्नीचा संशयास्पद मृत्यू; सांगलीत खळबळ

Sangli News : सांगली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, धामणी चौक परिसरातील मयूर नर्सरीला भीषण आग लागून एका महिलेचा होरपळून संशयास्पद मृत्यू झाला आहे. निकिता शिव मनगुळे-लोंढे असे मृत महिलेचे नाव असून, या आगीत नर्सरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, विश्रामबाग पोलीस कसून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निकिता मनगुळे-लोंढे आणि तिचा पती मूळचे कर्नाटकातील कागवाड येथील रहिवासी असून, ते सध्या सांगलीतील धामणी चौकाजवळील मयूर नर्सरीमध्ये राहत होते. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नर्सरीमधील पत्र्याच्या शेडला तसेच झाडांना अचानक आग लागली.

आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत निकिता ज्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती, तेथे ती आगीत होरपळली होती.

घटनास्थळी तपासादरम्यान त्या पत्र्याच्या शेडला बाहेरून कडी लावलेली असल्याचे आढळून आले आहे. तसेच आगीच्या घटनेनंतर निकिताच्या पतीने घटनास्थळावरून पलायन केल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे, त्यामुळे मृत्यूबाबत संशय अधिक गडद झाला आहे.

दरम्यान, महिलेचा मृत्यू अपघाती आहे की घातपाताचा, याबाबत तपास सुरू असून, रात्री उशिरापर्यंत तिच्या पतीचा शोध विश्रामबाग पोलिसांकडून घेतला जात होता. या प्रकरणामुळे सांगली शहरात खळबळ उडाली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!