Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘शहाजी बापू मित्र पक्षांनी तुमचा घात केला…मी तुमच्या पाठिशी’; एकनाथ शिंदे यांचा पहिल्यांदाच भाजपवर वार

‘शहाजी बापू मित्र पक्षांनी तुमचा घात केला…मी तुमच्या पाठिशी’; एकनाथ शिंदे यांचा पहिल्यांदाच भाजपवर वार

सांगोला: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराला देखील वेग आला आहे, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवरून नाराजी व्यक्त केली होती, दुखत होत, डॉक्टरने ऑपरेशनचा सल्ला दिला असताना देखील आपण लोकसभेमध्ये भाजपचा प्रचार केला असं शहजी बापू पाटील यांनी म्हटलं होतं. दरम्यान आज शहाजी बापू पाटील यांच्या मतदार संघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली, या सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी नाव न घेतला पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच आपण शहाजी बापू पाटील यांच्या पाठिशी उभे आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शिंदे?

शहाजी बापू हे सांगोल्याचे जखमी शेर आहेत, जनतेच्या मनात चीड आणि आग आहे, त्यामुळे या मतदारसंघात सगळेच मतदानासाठी बाहेर पडले तर विजय आपलाच आहे. शहाजी बापूमुळे सांगोल्याचा विकास झाला आहे, बापू स्वतःचे काम कधी घेऊन आले नाहीत, ते नेहमी या भागतील विकास कामंच माझ्याकडे घेऊन यायचे, विधानसभा निवडणुकीच्या काळात पुतळ्यासाठी मी विमानात बसायच्या आधी 50 लाखांचा निधी दिला होता. जीवाशी खेळून बापुंनी लोकसभेत आपल्या मतदारसंघात भाजपला लीड दिलं होतं. बापू तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या मित्र पक्षांनी तुमचा गेम केला आहे, तर मी तुमच्या पाठिशी उभा आहे, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, बापू खूप हळवे आहेत. सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही, उत्तम जानकर यांनीही खूप काही सांगितले आहे, बापू आता उत्तम जानकर आणि तुम्ही दोघे मिळून पुढे जा. काय झाडी, काय डोंगरने आमचे बापू सेलिब्रेटी झाले. बापूला एकदा फसवले आता बापूला कोणी फसवू शकत नाही, हीच जनता आता विरोधकांना त्यांची जाग दाखवेल, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!