Election Results 2026 : महानगरपालिका निवडणुकीचा पहिला विजयी निकाल कोल्हापूरमधून समोर आला असून भारतीय जनता पक्षाने येथे दमदार सुरुवात केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.
या प्रभागातून राजानंद महाडिक, प्रमोद देसाई, वंदना मोहिते आणि विजय माने यांनी विजय मिळवत भाजपची आघाडी अधिक मजबूत केली आहे. पहिला निकालच भाजपच्या बाजूने लागल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, कोल्हापूरमध्ये भाजपची पकड अधिक बळकट होत असल्याचे चित्र आहे.
हा विजय महापालिका निवडणुकीतील पुढील निकालांसाठी महत्त्वाचा संकेत मानला जात असून, भाजपने राज्यभरात जोरदार कामगिरीची नांदी दिल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.


