सोलापूर: ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसून ऊस तोडीसाठी जात असताना आईच्या कुशीतून खाली पडल्याने ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून ३ वर्षाची बालिका गंभीर जखमी होऊन मरण पावली. मनीषा मुकेश काजल (वय ३, रा. करवानी जि. खांडवा, मध्यप्रदेश सध्या रा. म्हैसलगी) असे मयत झालेल्या बालिकेचे नाव आहे. गुरुवारीहा अपघात म्हैसलगी (ता. अक्कलकोट) येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास घडला.
सकाळी ७ वाजेच्या सुमारास मनीषा ही तिची आई (सोना) यांच्या कुशीत बसून ट्रॅक्टरच्या ट्रॅलीतून उस तोडणीसाठी बिराजदार यांच्या शेताकडे निघाले होते. वाटेत ट्रॅक्टर खड्ड्यात आदळला. त्यावेळी आईच्या कुशीत बसलेली मनीषा ‘काजल ही खाली कोसळली. त्यावेळी पाठीमागे असलेल्या दोन छकडा ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने मनिषा ही गंभीर जखमी झाली होती. तिला मुकेश काजल (वडील) यांनी रुग्णालयात दाखल केले असता ती उपचारापूर्वी मयत झाली.


