Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला बोट का कापलं? सुषमा अंधारेंचा फोटोंसह खळबळजनक दावा

रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला बोट का कापलं? सुषमा अंधारेंचा फोटोंसह खळबळजनक दावा

Sushma Andhare On Rupali Chakankar: नाशिकचा तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात ‘जादूटोणा’ आणि ‘अघोरी विद्ये’वरून नवा संघर्ष पेटला आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप केले असून, चाकणकर या तंत्रमंत्र विद्येत सामील असल्याचा दावा केला आहे. पुराव्यादाखल अंधारे यांनी काही फोटो प्रसिद्ध करत या प्रकरणाला थेट अघोरी कृत्यांशी जोडले आहे.

‘अनामिका’ कापण्यामागे अघोरी कनेक्शन?
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येचा मुहूर्त साधून रुपाली चाकणकर यांनी आपल्या हाताची अनामिका (Ring Finger) कापली होती. तंत्रशास्त्रानुसार, अनामिका बोट हे सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून, वशीकरण किंवा विशिष्ट ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी या बोटाचा वापर केला जातो, असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला आहे. पुराव्यादाखल त्यांनी चाकणकर यांच्या बोटाला पांढरी पट्टी बांधलेले काही फोटोही माध्यमांना दाखवले.

अशोक खरातशी घनिष्ठ संबंधांचा दावा
अंधारे यांनी केवळ जादूटोण्याचेच नव्हे, तर आरोपी अशोक खरात आणि चाकणकर यांच्यातील घरगुती संबंधांवरही बोट ठेवले आहे. खरातची भाची चाकणकर यांच्या घरी राहते आणि खरातच्या मुलीच्या लग्नालाही चाकणकर उपस्थित होत्या, असा दावा त्यांनी केला. इतकेच नव्हे तर, पीडित महिलांना चाकणकर रात्री उशिरा फोन करून धमकावत होत्या, असाही संतापजनक आरोप अंधारे यांनी केला आहे.

नार्को टेस्ट आणि आर्थिक चौकशीची मागणी
या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी सुषमा अंधारे यांनी प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत:

  • नार्को टेस्ट: संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी रुपाली चाकणकर यांची नार्को टेस्ट करण्यात यावी.
  • महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर होऊ नये, यासाठी त्यांना तत्काळ पदावरून हटवावे.
  • आर्थिक तपास: अशोक खरात आणि चाकणकर यांच्या संपत्तीच्या स्रोतांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत (EOW) सखोल चौकशी व्हावी.

पार्श्वभूमी: काय आहे खरात प्रकरण?
स्वतःला अंकशास्त्रज्ञ (Numerologist) म्हणवून घेणारा आणि बड्या राजकीय नेत्यांचा सल्लागार असलेला अशोक खरात याला नाशिकमध्ये एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. खरातच्या अटकेनंतर आता त्याचे राजकीय लागेबांधे एक-एक करून समोर येत आहेत. दरम्यान, हे सर्व आरोप राजकीय भूमिकेतून करण्यात आले असून, यावर अद्याप रुपाली चाकणकर किंवा अधिकृत तपास यंत्रणांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!