Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chief Justice B.R. Gavai : सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकीलाची संतापजनक प्रतिक्रिया, म्हणाले, जे करायला सांगितले ते…

Chief Justice B.R. Gavai : सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकीलाची संतापजनक प्रतिक्रिया, म्हणाले, जे करायला सांगितले ते…

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर सोमवारी (६ ऑक्टोबर २०२५) बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “परमात्म्याने जे करायला सांगितले ते मी केले. मला या घटनेचे थोडंही दु:ख नाही. मी कोणाचीही माफी मागणार नाही,” असे किशोर याने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.

खजुराहो विष्णू मूर्ती प्रकरणातील CJI गवईंच्या वक्तव्याला ‘सनातन धर्माचा अपमान’ मानणाऱ्या किशोरवर बार कौन्सिल ऑफ इंडियाने (BCI) तात्काळ कारवाई करत वकिलीची सनद निलंबित केली आहे. मात्र, CJI गवईंनी मनाचा मोठेपणा दाखवत किशोरला गुन्हा दाखल न करता माफ केले, यामुळे न्यायव्यवस्थेच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

काय आहे प्रकरण

१६ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ता राकेश दालाल यांनी मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी मंदिरात (UNESCO जागतिक वारसा स्थळ) असलेल्या ७ फूट उंचीच्या भगवान विष्णूच्या मूर्तीच्या पुनर्निर्माणाची मागणी केली होती. ही मूर्ती मध्ययुगीन काळात नष्ट झाली असल्याचा दावा करत, याचिकाकर्त्याने तिचे पुनर्स्थापन हिंदूंच्या उपासना हक्काचा भाग असल्याचे सांगितले.

मात्र, CJI गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली, कारण हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अधिकारक्षेत्रात येते. CJI गवई म्हणाले, “ही प्रचारात्मक जनहित याचिका आहे. भगवान विष्णूलाच सांगा, ते काही तरी करतील. तुम्ही विष्णूचे कट्टर भक्त आहात तर प्रार्थना करा आणि ध्यान धरा. शिव मंदिरात जाऊन पूजा करा, तिथे खजुराहोतील सर्वात मोठे शिवलिंग आहे.”

या वक्तव्याने सोशल मीडियावर वाद भडकला. काहींनी CJI गवईंवर ‘हिंदूभावनांचा अपमान’ केल्याचा आरोप लावला आणि त्यांच्या महाभियोगाची मागणी केली. १८ सप्टेंबरला CJI गवईंनी स्पष्टीकरण देत, “मी सर्व धर्मांचा आदर करतो, खरा धर्मनिरपेक्षवाद विश्वास ठेवतो,” असे म्हटले. त्यांनी दर्गा आणि गुरुद्वारा येथेही भेट दिल्याचा उल्लेख करत, हे वक्तव्य ASI च्या अधिकारक्षेत्रावर आधारित असल्याचे सांगितले.

६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३५ वाजता कोर्ट नंबर १ मध्ये CJI गवई यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद सुरू असताना राकेश किशोरने अचानक स्पोर्ट्स शूज काढून CJI कडे फेकण्याचा प्रयत्न केला. बूट खंडपीठापर्यंत पोहोचला नाही, पण किशोरने ओरडून सांगितले, “हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही!” सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन, शाहदरा बार असोसिएशन आणि दिल्ली बार कौन्सिलचे मेंबर कार्ड सापडले. दिल्ली पोलिसांनी त्याची चौकशी केली, पण CJI गवईंच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल न करता त्याला तीन तासांत सोडून देण्यात आले.

CJI गवई शांत राहिले आणि म्हणाले, “हे सगळे पाहून कोणी विचलित होऊ नका. मला याचा काहीही फरक पडत नाही. मी शेवटचा व्यक्ती आहे ज्याला अशा गोष्टींनी प्रभावित करता येईल.” ते सुनावणी सुरूच ठेवले.

राकेश किशोर यांचे वादग्रस्त वक्तव्य काय?

घटनेनंतर किशोर याने माध्यमांशी बोलत, “१६ सप्टेंबरपासून मी झोपलोच नाही. CJI गवईंनी विष्णू मूर्तीच्या याचिकेची थट्टा उडवली. इतर धर्मांच्या प्रकरणात मोठे निर्णय घेतले जातात, पण सनातन धर्माच्या बाबतीत नकारात्मक निर्णय. मी हिंसेला विरोधी आहे, माझ्यावर एकही केस नाही. मी गोल्ड मेडलिस्ट आहे, नशेत नव्हतो. पण माझ्यासारख्या व्यक्तीने हे का केले, याचा विचार करा. माझ्यावर कारवाई झाली तरी मी तयार आहे.” त्याने पुढे सांगितले की, हे कृत्य परमेश्वराने करायला सांगितले, त्यामुळे पश्चात्ताप नाही आणि माफी मागणार नाही. किशोर २००९ पासून दिल्ली बार कौन्सिलचा सदस्य असून, २०११ पासून सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचा तात्पुरता सदस्य आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!