Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

UAE Arrests Indians: युएईमध्ये 19 भारतीयांना अटकेचे आदेश; AI द्वारे युद्धाचे बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी कारवाई

UAE Arrests Indians: युएईमध्ये 19 भारतीयांना अटकेचे आदेश; AI द्वारे युद्धाचे बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी कारवाई

UAE Arrests Indians : आखाती देशात इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त अरब अमिरातीने (UAE) रविवारी 35 जणांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये 19 भारतीयांचा समावेश असून, त्यांच्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘दिशाभूल करणारा आणि बनावट आशय असलेले व्हिडिओ क्लिप’ प्रसारित केल्याचा आरोप आहे.

ताज्या यादीनुसार, विविध राष्ट्रीयत्वाच्या 25 व्यक्तींचा समावेश असून त्यात 17 भारतीय आहेत, ज्यांच्यावर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी ज्या 10 लोकांची नावे जाहीर करून अटकेचे आदेश दिले होते (ज्यात दोन भारतीयांचा समावेश होता), ही कारवाई त्यापेक्षा वेगळी आहे, असे ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. यूएईची अधिकृत वृत्तसंस्था ‘वाम’ (Wam) ने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना त्वरित खटल्यासाठी पाठवण्यात आले आहे.

आरोपींवर कोणते आरोप आहेत?

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या 10 आरोपींच्या गटाने देशाच्या हवाई हद्दीत क्षेपणास्त्रांची हालचाल, ती रोखल्याची दृश्ये आणि हल्ल्यांचे परिणाम दर्शवणारे मूळ व्हिडिओ क्लिप्स प्रसिद्ध आणि प्रसारित केल्या होत्या. या गटात पाच भारतीय, एक पाकिस्तानी, एक नेपाळी, दोन फिलिपिनो आणि एका इजिप्शियन नागरिकाचा समावेश होता. या लोकांनी अशा घटना पाहणाऱ्या लोकांच्या समूहाचे चित्रीकरण केले आणि त्यामध्ये स्वतःचे भाष्य (Commentary) तसेच असे ध्वनी प्रभाव जोडले, ज्यामुळे हल्ले अद्याप सुरूच असल्याचे भासले. यामुळे लोकांमध्ये भीती आणि घबराट निर्माण होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एआय (AI) द्वारे तयार केलेला आशय

दुसऱ्या गटाने एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे तयार केलेला बनावट व्हिडिओ आशय प्रसारित केला किंवा देशाबाहेरील जुन्या घटनांचे फुटेज पुन्हा शेअर करून ते यूएईमध्येच घडल्याचा खोटा दावा केला. या क्लिपमध्ये स्फोट आणि क्षेपणास्त्रांची कृत्रिम दृश्ये होती. या खोट्या दाव्यांना विश्वासार्हता देण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यामध्ये अनेकदा राष्ट्रीय ध्वज किंवा विशिष्ट तारखांचा वापर करण्यात आला होता, असे ॲटर्नी जनरल डॉ. हमद सैफ अल शम्स यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सात व्यक्तींच्या या गटात पाच भारतीय आणि नेपाळ व बांगलादेशातील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!