Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सहा हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ‘आप’च्या तीन नेत्यांविरोधात ईडीकडून एफआयआर दाखल

सहा हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ‘आप’च्या तीन नेत्यांविरोधात ईडीकडून एफआयआर दाखल

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. ‘आप’ सरकारच्या काळात झालेल्या तीन वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंगअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. रुग्णालय बांधकाम, सीसीटीव्ही आणि शेल्टर होम घोटाळ्यात ईसीआयआरची नोंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत लवकरच ‘आप’च्या बड्या नेत्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन सर्वात जास्त अडचणीत येऊ शकतात.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रुग्णालय बांधकाम घोटाळा (५,५९० कोटी) घोटाळ्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात माजी आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आहे. दिल्ली सरकारने 2018-19 मध्ये 24 रुग्णालय प्रकल्पांना मंजुरी दिली होती. आयसीयू रुग्णालय ६ महिन्यांत बांधायचे होते, मात्र ३ वर्षांनंतरही हे काम अपूर्ण होते. या रुग्णालयांच्या उभारणीसाठी ८०० कोटी रुपये खर्च करण्यात आले, मात्र केवळ ५० टक्केच काम झाले. एलएनजेपी रुग्णालयाचा खर्च ४८८ कोटींवरून ११३५ कोटींवर गेला. अनेक ठिकाणी मंजुरीशिवाय बांधकामे, कंत्राटदारांची भूमिका संशयास्पद एचआयएमएस यंत्रणा २०१६ पासून प्रलंबित असून, जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा आरोपही होत आहे.

सीसीटीव्ही घोटाळा
2019 मध्ये दिल्लीच्या 70 विधानसभा मतदारसंघात 1.4 लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. हे कंत्राट सरकारी कंपनी बीईएलला देण्यात आले होते. हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने बीईएलला १७ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर कोणतेही ठोस कारण न देता दंड माफ करण्यात आला. त्या बदल्यात सत्येंद्र जैन यांना कंत्राटदारांमार्फत सात कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.

डीयूएसआयबी घोटाळा
डीयूएसआयबीशी (दिल्ली अर्बन शेल्टर बोर्ड) संबंधित अनेक घोटाळे समोर आले आहेत. बनावट एफडीआरच्या माध्यमातून २०७ कोटी रुपयांचा अपहार झाल्याची माहिती समोर आली आहे. पटेल नगरमध्ये १५ लाख रुपयांची रस्ता दुरुस्ती दाखवून फसवणूक करण्यात आली. टाळेबंदीच्या काळात केलेल्या कामाबाबत खोटी कागदपत्रेही तयार करण्यात आली. २५० कोटींच्या शेल्टर होम घोटाळ्यात बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने पगार दाखवण्यात आला.

सीबीआय आणि एसीबी या प्रकरणांचा तपास करत आहेत. आता त्या एफआयआरच्या आधारे ईडीनेही मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!