Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

HC on Live in Relationship: लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचानिर्णय

HC on Live in Relationship: लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचानिर्णय

HC on Live in Relationship:  लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत राजस्थान उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे. लग्न आणि लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत या निर्णयात सांगितलं आहे. ‘लग्नासाठी आवश्यक असलेले कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात. या आधारावर एखाद्याचे संवैधानिक अधिकार कमी करता येणार नाहीत’, असे राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कोटा येथील 18 वर्षीय महिला आणि 19 वर्षीय पुरुषाने दाखल केलेल्या संरक्षण मिळण्यासाठीच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय देण्यात आला. आपण स्वेच्छेने एकत्र राहत आहेत. असे या जोडप्याने न्यायालयाला सांगितले. त्यावर त्यांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे न्यायालयाने सांगितले.

तर सुरक्षा द्या -सर्वोच्च न्यायालय

न्यायालयाने भिलवाडा आणि जोधपूर पोलिस अधीक्षकांना याचिकेत नमूद केलेल्या तथ्यांची पडताळणी करण्याचे आणि आवश्यक असल्यास जोडप्याला आवश्यक सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश दिले.

गुरुवारी या आदेशाची प्रत उपलब्ध झाली

या जोडप्याने सांगितले की, त्यांनी 27 ऑक्टोबर 2025 रोजी लिव्ह-इन करार केला होता. तिच्या कुटुंबाने या नात्याला विरोध केला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी कोटा पोलिसांकडे याबद्दल तक्रार केली, तेव्हा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

या याचिकेला विरोध करताना, सरकारी वकील विवेक चौधरी यांनी युक्तिवाद केला की, तरुणाने 21 वर्षांचे कायदेशीर वय गाठले नाही. पुरुषांसाठी हे लग्नाचे किमान कायदेशीर वय असल्याने त्याला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची परवानगी देऊ नये.

न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. संविधानाच्या कलम 21 अंतर्गत हमी दिलेला जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार केवळ याचिकाकर्त्यांनी लग्नासाठी कायदेशीर वय गाठले नसल्यामुळे नाकारता येत नाही, न्यायालयाने सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!