Gold Price News: सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एन गुढी पाडव्याच्या मुहूर्ताच्या दिवशी सोन्याच्या दरात एकाच दिवसात 10 हजार रुपयांची घसरण झाली होते. तर चांदीच्या दरात ही तब्बल 20 हजार रुपयांची घसरण झाली आहे. दर कमी झाल्याने सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. सोन्याच्या दरातली ही घसरण कायम आहे. सोन्याच्या दरात 4,297 रुपयांची घसरण झाली आहे.
सोन्याच्या दरात 4,297 रुपयांची घसरण
सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारी घसरण कायम आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून 20 मार्च 2026 या दिवसातील सोन्याचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आयबीजेएनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 1,47,340 रुपये एक तोळा इतका आहे. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,51,637 रुपयांवर होता. आज त्यामध्ये 4,297 रुपयांची घसरण झाली आहे.
आयबीजेएकडून जारी करण्यात आलेल्या दरांनुसार 23 कॅरेट सोन्याचे दर 1,46,750 रुपये प्रति तोळा आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 1,34,963 रुपये तोळा, 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 1,10,505 रुपये इतका आहे.
चांदीचे दर 3,209 रुपयांनी कमी
आयबीजेएकडून चांदीचे दर देखील जारी करण्यात आले आहेत. चांदीचा आजचा एक किलोचा दर 2,33,600 रुपये आहे. काल चांदीचा दर 2,36,809 रुपये किलो होता. म्हणझेच आज चांदीचे दर 3,209 रुपयांनी कमी झाले आहेत. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,59,436 रुपये प्रति तोळा होता. तेव्हापासून शुक्रवारपर्यंत सोन्याच्या दरात 9,096 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे पाच दिवसात चांदीचे दर 19,193 रुपयांनी कमी झाले आहेत. सोमवारी चांदीचा दर 2,52,793 रुपये प्रति किलो होता.
हेही वाचा- Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा तडाखा! कांदा-गहू पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी
सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचं कारण अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध हे आहे. ज्यामुळं कच्चा तेलाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण कायम आहे तर गुंतवणूकदार सोन्या ऐवजी डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहेत.


