दमास्कस्स : इस्रायलने सीरियन लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला. यात मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून सीरियन लष्कर आणि डुझ समुदायाच्या गटांमध्ये संघर्ष सुरु आहे. यात डुझ समुदायाचे रक्षण करण्यासाठी इस्रायलने दमास्कसमधील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. त्यामुळे आता सीरिया कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सीरियाच्या दक्षिण स्वैदा भागात गेल्या काही दिवसांपासून हिंसक चकमकी सुरु आहेत. सीरियन रक्षा दल आणि डुझ मिलिशिया गटात युद्धबंदीचा निर्णय झाला होता, मात्र नंतर युद्धबंदीचे उल्लंघन झाले, त्यानंतर सीरियन लष्कराने स्वैदा प्रांतात कारवाई केली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी संघर्ष पुन्हा सुरु झाला.
सीरियन लष्कर आणि डुझ सदस्यांमध्ये संघर्ष झाला. सु-रक्षा दलांनी तागी नागरिकांची घरे जाळल्याचे वृत्त समोर आले आहे. या संघर्षांमध्ये 2 लहान मुलांसह 30 लोकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच आतापर्यंत या संघर्षात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 138 डुझ सैनिकांचाही समावेश आहे. डुझ समुदायाच्या सुरक्षिततेसाठी इस्रायलने ही कारवाई केली होती. याचे आणखी एक कारण म्हणजे देशाच्या स्व-सुरक्षेसाठी इस्रायलला आपल्या सीमेला लागून असलेल्या या भागात शस्रे नको आहेत, त्यामुळेच हा हल्ला करण्यात आला आहे.


