Today शनिवार, 2nd मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Meghalaya Coal Mine Blast : अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट; 18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

Meghalaya Coal Mine Blast : अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट; 18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

शिलाँग : मेघालय राज्यातील पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातील एका अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत किमान 18 कामगारांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती असून, अनेकजण खाणीत अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना थांगस्कू परिसरात घडली. स्फोटानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. स्फोटाच्या वेळी खाणीत नेमके किती कामगार उपस्थित होते, याची स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही, अशी माहिती पोलीस महासंचालक आई. नोंगरंग यांनी दिली.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून एक्स (X) वर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत जखमींनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये, जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

जखमींवर उपचार सुरू

पूर्व जयंतिया हिल्सचे पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी सांगितले की, एका जखमी व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देण्यात आले असून, पुढील उपचारांसाठी त्याला राजधानी शिलाँग येथे हलवण्यात आले आहे.

अवैध खाणीतच स्फोट झाल्याचा संशय

दुर्घटना ज्या ठिकाणी घडली ती कोळसा खाण अवैधरित्या चालवली जात होती, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने 2014 साली मेघालयातील ‘रेट होल’ कोळसा खाणींवर बंदी घातली होती. तरीही अशा अवैध खाणी सुरू कशा राहिल्या, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!