Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nitish Kumar: नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा हिजाब खेचला; RJD-काँग्रेसचा संताप, पहा व्हिडीओ

Nitish Kumar: नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा हिजाब खेचला; RJD-काँग्रेसचा संताप, पहा व्हिडीओ

Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटपाच्या कार्यक्रमात एका मुस्लिम महिला डॉक्टरला पत्र देताना नितीश कुमारांनी तिच्या चेहऱ्यावरील हिजाब स्वतःच्या हाताने खाली सरकवला. हा प्रकार पाहून उपस्थित काही जण हसले, तर महिला डॉक्टर काही क्षण अस्वस्थ दिसली.

महिला डॉक्टरला पत्र देताना…

हा कार्यक्रम आज सोमवारी पाटण्यातील मुख्यमंत्री निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. यात 1283 नवनिर्वाचित आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्यात आले. महिला डॉक्टर नुसरत परवीन यांच्याकडे पत्र देताना नितीश कुमारांनी हिजाबकडे इशारा करत ये क्या है जी? असा प्रश्न केला. महिला डॉक्टरनेहिजाब है सर” असे उत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले हटाइए इसे आणि स्वतः हाताने हिजाब खाली सरकवला.

आरजेडीची बोचरी टीका

या व्हिडिओवरून राजकीय वाद उफाळून आला आहे. राजद (RJD) ने नितीश कुमारांची मानसिक स्थिती दयनीय असल्याची बोचरी टीका केली आणि ते 100 टक्के संघी झाले असल्याचा आरोप केला. राजदने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत हँडलवरून शेअर करत नीतीश बाबूंना काय झालं? असा प्रश्न उपस्थित केला.

काँग्रेसनेही या कृत्याचा तीव्र निषेध केला. पक्षाने म्हटले की, हे निर्लज्जपणा आहे. राज्याच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने जाहीरपणे असे नीच कृत्य केले आहे. यावरून बिहारमध्ये महिलांची सुरक्षा किती आहे, याचा अंदाज येतो. नितीश कुमारांनी या कृत्याबद्दल तात्काळ राजीनामा द्यावा. हे माफी योग्य नाही.

बिहार काँग्रेसनेही हा प्रकार लाजीरवाणा आणि निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. राज्यप्रमुखच जर सार्वजनिक व्यासपीठावर असे करत असतील, तर महिलांची सुरक्षाच काय? असा सवाल उपस्थित केला.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!