Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पूजा खेडकरला 15 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण ; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

पूजा खेडकरला 15 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण ; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

नवी दिल्ली: भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण देण्यास 15 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ देण्याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावला. खुल्या प्रवर्गातील उमेदवार व दिव्यांग उमेदवार म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळी संधी देता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. इतर मागास वर्ग (ओबीसी) तथा दिव्यांग कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप पूजावर आहे. याप्रकरणी तिच्या याचिकेवर न्या. बी. व्ही. नागरत्ना व न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. यावेळी केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यास पूजाने वेळ मागितला.

खंडपीठाने तिची मागणी मान्य करत अटकेपासूनची सूट ही 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यास हिरवा कंदील दाखवला. पण, यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करण्याच्या कथित प्रकरणात लिप्त दलालांची ओळख पटवण्यासाठी पूजाला कोठडीत घेऊन तिची चौकशी करण्याची गरज आहे, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (एएसजी) एस. व्ही. राजू यांनी केला. मात्र, पूजा तपास संस्थेला चौकशीत मदत करणार असल्याचे तिच्या वकील बीना माधवन यांनी खंडपीठापुढे सांगितले. त्यावर आरोपीला कोठडी देण्यात यावी, अन्यथा ती दलालांच्या नावांचा खुलासा करणार नाही, असे महाधिवक्ते राजू म्हणाले.

पूजाला यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी 9 वेळा संधी देण्यात आली. मात्र, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून ती अनेकदा परीक्षेला बसली. ती 2012 पासून यूपीएससीची परीक्षा देत आहे. जास्तीच्या संधी मिळाव्या म्हणून तिने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप राजू यांनी केला. परंतु, या आरोपांचे बीना माधवन यांनी खंडन केले. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकर एम्सच्या वैद्यकीय मंडळापुढे हजर झाली. या ठिकाणी तिच्या दिव्यांगत्वाची पुष्टी झाली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!