Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

US Iran War : अमेरिकेची इराणवर सागरी नाकेबंदीची धमकी; जागतिक तेलदरात उसळी, भारतावर मोठा परिणाम होणार

US Iran War : अमेरिकेची इराणवर सागरी नाकेबंदीची धमकी; जागतिक तेलदरात उसळी, भारतावर मोठा परिणाम होणार

US Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेत सागरी नाकेबंदीचा इशारा दिला आहे. इस्लामाबादमधील अमेरिका-इराण चर्चेची फेरी निष्फळ ठरल्यानंतर हा निर्णय पुढे आला आहे. प्रस्तावित नाकेबंदीअंतर्गत इराणच्या सर्व बंदरांवर ये-जा करणाऱ्या जहाजांवर बंदी घालण्याची योजना आहे. केवळ इराणी जहाजेच नव्हे, तर कोणत्याही देशाची जहाजे इराणी बंदरात गेल्यास किंवा तिथून बाहेर पडल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते.

या घडामोडींमुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. आखाती प्रदेशातील तणाव वाढल्याने जागतिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूर्ण युद्ध टाळत इराणवर दबाव वाढवण्यासाठी मर्यादित लष्करी कारवाईचे पर्यायही अमेरिका तपासत असल्याचे संकेत मिळत आहेत.

यावर इराणनेही कडक प्रतिक्रिया दिली आहे. शहरम इराणी यांनी अमेरिकेची नाकेबंदीची धमकी ‘हास्यास्पद’ असल्याचे सांगत ती फेटाळून लावली. इराणचे नौदल कोणत्याही आक्रमणाला ठाम प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या तणावाचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेत दिसून आला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत 7 ते 8 टक्क्यांची वाढ झाली असून अमेरिकन क्रूड ऑईलचा दर प्रति बॅरल 104 डॉलर्सच्या पुढे गेला आहे, तर ब्रेंट क्रूड 102 डॉलर्सवर पोहोचले आहे. या वाढत्या दरांचा परिणाम भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!