Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘1 कोटींची डील ठरली होती…’; करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप

‘1 कोटींची डील ठरली होती…’; करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप

Karuna Munde On Dhananjay Munde: बीडच्या राजकारणात नवे वादळ उसळले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यानंतर आता स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील हल्ल्याचा कट धनंजय मुंडे यांच्याच पाठबळाखाली रचला गेला असावा. करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पोलिसांच्या कैदेत असलेला आरोपी दादा गरड माझ्याकडे तीन वेळा येऊन गेला आहे. जेव्हा मी जरांगेकडे गेली होती. त्याने मला मेसेज केला तेव्हा मी जरांगेकडे होते. त्यानंतर लगेच धनंजय मुंडेंना माहिती मिळाली की मी मनोज जरांगेंकडे गेली आहे.

दादा गरड यांचे मोबाईल चेक करा 

दरम्यान, करुणा मुंडे यांनी पुढे म्हटलं की, दादा गरड यांचे मोबाईल तपासा. त्यात व्हॉट्सअॅप चॅट्स आहेत. धनंजय मुंडे यांनी त्याला सॉरी म्हणून मेसेज केला होता. धनंजय मुंडेंनी त्याला पाच लाख रुपये त्याला पाठवले होते. एका गरीब व्यक्तीला धनंजय मुंडे सॉरी का म्हणाले. त्यांनी त्याला पाच लाख कशासाठी दिले. हे सर्व पुरावे त्यांच्या मोबाईलमध्ये आहेत. मला दुसऱ्या आरोपीचीही रेकॉर्डिंग त्याने ऐकवली होती. त्यांची १ कोटीची डील सुरु होती, असा खळबजनक दावा करुणा मुंडेंनी केला आहे.

हेही वाचा – ‘जरांगे तारीख आणि जागा तुम्ही सांगा…’; मनोज जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

चौकशीसाठी नार्को-टेस्टची मागणी

करुणा मुंडे यांनी या प्रकरणात नार्को टेस्ट व इतर फॉरेन्सिक तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांनी धनंजय मुंडे, मनोज जरांगे आणि तत्पर व्यक्तींच्या सर्व शारीरिक व कौलनिक चाचण्या व्हाव्यात, असा आग्रह धरला. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणीही केली आहे. करुणा मुंडे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सीबीआयकडून तपास व्हावा, अशी मागणी केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!