Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महायुतीत पुन्हा धुसफूस, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून अजित पवारांविरुद्ध तक्रारींचा पाढा; मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची केली विनंती

महायुतीत पुन्हा धुसफूस, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून अजित पवारांविरुद्ध तक्रारींचा पाढा; मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची केली विनंती

मुंबई : प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुतीत दिवसागणिक अधिकाधिक खटके उडू लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेकांवर कुरघोड्याचे प्रयत्न सुरु आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन दान्ही पक्षांत वाद सुरु असताना आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लक्ष्य होत असताना शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.

दर महिन्याच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या खात्याच्या कामाचा आढावा घेतात. त्याप्रमाणे मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली. शिवसेना मंत्र्यांना अर्थखात्याकडून मिळत असलेल्या सावत्र वागणुकीबद्दल सर्वच मंत्र्यांनी संताप व्यक्त केला. निधी वाटपात शिवसेनेच्या खात्यांवर अन्याय होत आहे. तरतूद असलेल्या कामांमध्येही खोडा घातला जात आहे, अशी तक्रार मंत्र्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करायला सांगा, अशी मागणीही मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे समजते. यावेळी अजित पवारांच्या कार्यशैलीबद्दल सेनेच्या सर्वच मंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

विकासकाने करायची कशी?

तीन पक्षांचे सरकार असल्याने सगळ्यांना समान संधी मिळणे गरजेचे आहे. विकासनिधीचे समान वाटप होणे आवश्यक आहे. पण अर्थमंत्री अजित पवार आमच्या खात्यांना पुरेसा निधी देत नाहीत, मग विकासकामे करायची कशी, असा सवाल मंत्र्यांनी शिदेना विचारला. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसून आली.

जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीत शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यावर मी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलतो, लवकरच या प्रकरणात मार्ग निघेल, असा शब्द शिंदे यांनी मंत्र्यांना दिला. त्यामुळे आता या प्रकरणोंत शिंदे कसा मार्ग काढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!