Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नाराज छगन भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री, राजभवनात पार पडला शपथविधी

नाराज छगन भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री, राजभवनात पार पडला शपथविधी

पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी आज राजभवन येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले होते. अखेर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांची वर्णी लागली असून त्यांना अन्न व नागरी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता आहे.

नाराज असलेल्या छगन भुजबळ यांचं अखेर राज्याच्या मंत्रिमंडळात कमबॅक झालं आहे. त्यांनी आज (मंगळवार) मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल. सरकार जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. मी कोणत्याची खात्याची अपेक्षा केलेली नाही,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेली अन्न व नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षण ही खाती छगन भुजबळ यांना मिळणार असल्याची दाट शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!