मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोडे यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. विरोधकांकडून नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव विधीमंडळ सचिवांकडे सादर करण्यात आलो, विशेष म्हणजे नीलम गोऱ्हे या अधिवेशन सुरू झाल्यापासून गेल्या दोन दिवसांपासून विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी झालेल्या नाहीत. पण त्या आज (दि. ६) विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. त्या आजारी असल्याने अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकल्या नसल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला आहे. तीनही पक्षांकडून एकत्रितपणे विधीमंडळ सचिवांकडे अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची चर्चा सुरु आहे. पण खरे कारण समोर आलेले नाही.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
खरा अविश्वासाचा प्रस्ताव आणायला आमच्याकडून उशिरच झाला. आतापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या. अविश्वाचा प्रस्ताव आणल्यानंतर या अधिवेशनातच त्याबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. कुणीही असो, ज्याने एखाद्या नियमाचा आणि कायद्याचा भंग केला असेल, अविश्वासाचा ठराव ज्या कारणासाठी आणला ती कारणे तुमच्यासमोर येतील. पण पक्षांतर हाही एक विषय आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


