Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भाजप शहराध्यक्षपदासाठी कोणीच तयार होईना ! सध्यातरी शहराध्यक्ष पदावर धीरज घाटे कायम

भाजप शहराध्यक्षपदासाठी कोणीच तयार होईना ! सध्यातरी शहराध्यक्ष पदावर धीरज घाटे कायम

पुणे : पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्ष पदावरून सध्या मोठी रस्सीखेच सुरू आहे, असे वातावरण सुरू असताना चक्क प्रदेशाध्यक्षांनी विचारणा केल्यानंतर कोणीच या पदावर काम करण्यासाठी तयार होईना, अशी स्थिती झाली आहे. पुणे शहराचे विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मुदत संपण्यापूर्वीच शहरात भाजपच्या शहराध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली होती. सुरुवातील भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पूत्र शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे नाव पुढे आले. त्यांना पक्षाकडून पदासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी मतदारसंघात काम करावयाचे असे सांगून अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला.

दरम्यान, भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी कसब्याचे आमदार हेमंत रासने यांचे नाव चर्चेत आहे. त्याच वेळी पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बीडकर आणि श्रीनाथ भिमाले यांचे नाव चर्चेत आले. ओबीसी कार्ड चालविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पक्षाचे निरीक्षक पुण्यात आले. त्यांनी मते जाणून घेतली. त्यानुसार तीन नावे निश्चित करून ती प्रदेश पातळीवर पाठविण्यात आली होती. एक मे रोजी शहराध्यक्षपदाचे नाव जाहीर होणार अशी चर्चा होती. मात्र, आता तर कोणीच पद स्वीकारत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहराध्यक्ष पदावर धीरज घाटे हेच कायम राहणार आहेत हे निश्चित आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!