पुणे: पुणे महापालिकेने मिळकत थकबाकीदारांसाठी नवी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अभय योजना ही जाहीर जाणार आहे. जुन्या हद्दीसह समाविष्ट गावांतील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी दंडाच्या रकमेत 75 टक्के सूट देण्यात आली आहे. 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी 4 लाख 97 हजार 172 मिळकत धारक पात्र ठरणार आहेत.
धारक पात्रांकडून मूळ कराची रक्कम 3 हजार 158 कोटी रुपये येणे असून दंडाची रक्कम ९ हजार २ कोटी रुपये आहे. सर्वांनी या योजनेचा लाभ घेतल्यास साधारण साडेपाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत. यापूर्वी अभय योजनेचा लाभ घेतलेल्या मिळकतधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
मागील योजनेत लाभ घेतलेल्या 1 लाख 40 हजार 437 मिळकत धारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांच्याकडे सध्या 900 कोटी रुपये थकबाकी आहे. त्यांच्या मिळकतीवर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त राम यांनी सांगितले.


